महाराष्ट्र ग्रामीण

कागल येथील बौद्धिक अक्षम विद्यालयात वाढदिवसानिमित्त फळ वाटप!

कागल (सलीम शेख ) : कागल येथील स्वर्गीय गणपतराव गाताडे निवासी व अनिवासी बौद्धिक अक्षम विद्यालय शाळेतील विद्यार्थ्यांना नुकताच एका विशेष निमित्ताने फळांचे वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवत, रोहित कांबळे आणि त्यांचे चिरंजीव कु. अरव कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबवण्यात आला.
रोहित कांबळे यांनी आपल्या चिरंजीवाच्या वाढदिवसाचा आनंद या विशेष मुलांसोबत साजरा करण्याचे ठरवले. या निमित्ताने त्यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना फळांचे वाटप करून त्यांचा दिवस गोड केला.

यावेळी यशवंत ब्रिगेड कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष संदीप हजारे, सामाजिक कार्यकर्ते रोहित कांबळे, अर्चना कांबळे, मोरबाळे सर, तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आनंद मिळाला आणि त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. सामाजिक कार्यकर्त्यांनी दाखवलेल्या या उदारतेमुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अशाप्रकारे सामाजिक उपक्रमातून वाढदिवस साजरा करण्याचा हा आदर्श इतरांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button