महाराष्ट्र ग्रामीण

मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या २८९ वाहन चालकांवर कारवाई; कोल्हापूर शहर वाहतूक शाखेकडून २,५९,२००/- दंड वसूल!

कोल्हापूर (सलीम शेख ): मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर कोल्हापूर शहर वाहतूक नियंत्रण शाखेने धडक कारवाईची विशेष मोहीम राबवली आहे. या मोहिमेत एकूण २८९ वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून दोन लाख एकोणसाठ हजार दोनशे रुपये इतका दंड आकारण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग, कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. कोल्हापूर शहरात मलबार हॉटेल चौक, खानविलकर पेट्रोल पंप, गोखले कॉलेज चौक, ताराराणी सिंग्नल चौक, विवेकानंद कॉलेज परिसर आणि सायबर चौक या ठिकाणी सकाळी ०९.०० ते ११.०० या वेळेत पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना नेमून ही मोहीम राबविण्यात आली.
या कारवाईत लायसन्स जवळ न बाळगणाऱ्या सर्वाधिक ९३ केसेसवर दंड ६७,५०० कारवाई करण्यात आली. तसेच, ट्रीपल सीट उल्लंघन करणाऱ्या ५० केसेसवर दंड ५०,००० आणि वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणाऱ्या ३२ केसेसवर दंड ४३,००० कारवाई करण्यात आली. याव्यतिरिक्त, रहदारीस अडथळा करणे २८ केसेस, अस्पष्ट नंबर प्लेट १६ केसेस, पोलीसांचे आदेश न पाळणे २० केसेस, आणि इतर २४ केसेस अशा विविध प्रकारच्या उल्लंघनाखाली कारवाई करण्यात आली आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक , अपर पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे व मार्गदर्शनाखाली प्रिया पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी, शहर विभाग, आणि शहर वाहतूक शाखेचे पो.नि. नंदकुमार मोरे यांच्या निरीक्षणाखाली करण्यात आली.
शहर वाहतूक शाखा, कोल्हापूरने सर्व नागरिक/वाहनचालकांना आवाहन केले आहे की, मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर कारवाईची मोहीम पुढील काळातही व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व वाहनचालकांनी कायदेशीर कारवाई टाळावी आणि वाहतुकीचे नियम पाळावेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button