महाराष्ट्र ग्रामीण

सुर्वेनगरमध्ये काँग्रेसला मोठे बळ: शिवराज पाटील यांचा सतेज पाटील यांच्या हस्ते पक्षात उत्साहात प्रवेश!

कोल्हापूर: (प्रतिनिधी): कोल्हापूर महानगरपालिका प्रभाग क्र. २० (सुर्वेनगर) येथील राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. सुर्वेनगरमधील प्रभावी आणि लोकप्रिय सामाजिक कार्यकर्ते शिवराज पाटील यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह रविवारी, १६ नोव्हेंबर २०२५ रोजी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. माजी गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या हस्ते आणि आमदार ऋतुराज संजय पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

शिवराज पाटील यांच्यासोबतच महत्त्वाचे कार्यकर्ते विजयकुमार कांबळे आणि त्यांच्या संपूर्ण टीमने काँग्रेसचे सदस्यत्व स्वीकारल्यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसची ताकद सुर्वेनगर प्रभागात लक्षणीय वाढणार आहे. शिवराज पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या या प्रवेशामुळे स्थानिक पातळीवर काँग्रेसच्या बळकटीसाठी मोलाची मदत होणार आहे. पक्षप्रवेशानंतर बोलताना माजी आमदार सतेज पाटील यांनी शिवराज पाटील यांच्या कार्याचे कौतुक केले.

“शिवराज पाटील यांनी ‘शिवराज पाटील फाऊंडेशन’च्या माध्यमातून अनेक वर्षांपासून सुर्वेनगर परिसरातील नागरिकांसाठी निरपेक्ष वृत्तीने काम केले आहे. त्यांचे कार्य लोकाभिमुख आणि प्रामाणिक आहे. अशा निष्ठावान कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे काँग्रेस पक्षाची ताकद वाढणार असून, कोल्हापूरच्या विकासासाठी आता ते काँग्रेसच्या माध्यमातून अधिक जोमाने काम करतील,” असे सतेज पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

 

हा प्रवेश केवळ कार्यकर्त्यांचा नसून, एका महत्त्वाच्या सामाजिक गटाचा काँग्रेसमध्ये झालेला समावेश आहे. कोल्हापूर दक्षिण मतदारसंघाचे आमदार ऋतुराज संजय पाटील यांच्या उपस्थितीमुळे युवा शक्तीला योग्य मार्गदर्शन मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. या प्रवेशामुळे प्रभाग क्र. २० मध्ये काँग्रेसला नवा चेहरा आणि मजबूत संघटनात्मक आधार मिळाला असून, आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने हा प्रवेश अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

या सोहळ्याला परिसरातील काँग्रेसचे अनेक प्रमुख नेते, माजी पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांमध्ये माजी नगरसेवक मधुकर रामाणे, तसेच राहुल माने, इंद्रजीत बोंद्रे, धीरज पाटील, कळंबा ग्रामपंचायतच्या सरपंच सुमन गुरव, राजू साबळे, आंबोळे सर, भीमराव देसाई, विलास बारड, अरुण पाटील, नंदकुमार भिसे, यशवंत शिंदे, सूर्यकांत पाटील- येवतीकर, आशिष पाटील, केरबा जाधव, युवराज तेली, गौरव सावंत, अभिजीत देठे, आर. डी. पाटील, श्रीमती जयश्री कांबळे, सुनील शिपुगडे, विजय गुजर, लखन चव्हाण, प्रवीण पाटील, प्रशांत पवार, नीता शिवराज पाटील, श्रीकांत मोरे, सतीश परके, अलका सनगर यांचा समावेश होता. शिवराज पाटील फाऊंडेशनचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित असल्याने कार्यक्रमाला उत्साहाचे वातावरण होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button