महाराष्ट्र ग्रामीण

टिपू सुलतान जयंतीनिमित्त कोल्हापुरात रक्तदान शिबिर यशस्वी; नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग!

कोल्हापूर :”रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान” या उदात्त विचाराला मूर्त रूप देत हजरत टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त गुरुवार, २० नोव्हेंबर २०२५ रोजी कोल्हापूर शहरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत पार पडलेल्या या शिबिराला शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शहरातील विविध भागांतून आलेल्या नागरिकांनी सक्रिय सहभाग घेत रक्तदान केले. “आपले एक थेंब रक्त कोणाचा तरी जीव वाचवू शकते” या भावनेतून अनेकांनी जीवनदानासाठी पुढे येत रक्तदान केले.

या शिबिराच्या यशस्वी आयोजनात फजल मुजावर, सलमान मौलवी, शाहीद मोमीन, सोहेल बागवान, युसुफ शेख यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. नागरिकांकडून मिळालेल्या प्रतिसादाबद्दल आयोजकांनी समाधान व्यक्त करत पुढेही अशा सामाजिक उपक्रमांत सहभागी होण्याचे आवाहन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button