महाराष्ट्र ग्रामीण

बारामतीत राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; विदेशी मद्यासह चारचाकी वाहन जप्त!

बारामती (कोटा न्यूज नेटवर्क) : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने सुसूत्र गुप्त माहितीच्या आधारे सांगवी–बारामती रोडवरील माळेगाव फाट्याजवळ मोठी कारवाई केली. मध्यप्रदेशमध्ये विक्रीस मान्य असलेले परंतु महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेले विदेशी मद्य वाहतूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले असून, अवैध वाहतुकीत वापरलेली चारचाकी गाडी आणि विदेशी मद्यासह एकूण ₹6,97,040 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई ३ डिसेंबर २०२५ रोजी, राज्य उत्पादन शुल्क विभाग वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
निरीक्षक व पथकाने संशयित स्विफ्ट डिझायर (MH 01 BF 9165) या वाहनाची तपासणी केली असता, मध्यप्रदेश राज्य निर्मित विदेशी मद्याचे एकूण २० बॉक्स आढळून आले.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने मद्यासह वाहन ताब्यात घेतले असून दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. ते मूळचे राजस्थानातील जालोर जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. तपासादरम्यान विदेशी मद्याचा पुरवठा नेमका कोठून झाला, कोणाला देणे अपेक्षित होते, तसेच परराज्यातील साखळीत स्थानिक सहभाग आहे का याची चौकशी सुरू आहे. या कारवाईत निरीक्षक शहाजी शिंदे, दुय्यम निरीक्षक सागर साबळे, मनोज होलम, गिरीशकुमार कर्चे तसेच जवान निखिल देवडे, सुरेश खरात, सागर दुबळे व टी.एस. काळे यांनी सहभाग घेतला. पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button