महाराष्ट्र ग्रामीण

मोठी बातमी: कोल्हापुरात अवैध दारू विक्रीवर मोठी कारवाई!

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने मा. पोलीस अधीक्षक श्री. योगेश कुमार सो यांच्या सूचनेनुसार, स्थानिक गुन्हे शाखेने अवैध दारू विक्रीवर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत १७७ लिटर भेसळयुक्त (सिंधी माडी-माडी)विदेशी दारू जप्त करण्यात आली असून, एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक श्री. योगेश कुमार सो यांच्या आदेशानुसार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुशांत चव्हाण यांनी या अवैध व्यवसायाच्या माहितीच्या आधारे कारवाईसाठी पथके तयार केली. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, वठारसांगळी, ता. करवीर येथील किरण लक्ष्मण सासणे व. ३२, रा. धोंडा चौक, वठारसांगळी याच्या घराजवळील पाठीमागील बाजूस असलेल्या एका खोलीमध्ये सिंधी माडी-माडी व विदेशी दारूची अवैध विक्री चालू होती.

या माहितीच्या आधारावर, पोलीस निरीक्षक श्री. सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली, स.हा.पोलीस निरीक्षक सागर वाघ यांच्या पथकाने दिनांक ०३/१२/२०२५ रोजी वठारसांगळी, ता. करवीर येथील आरोपीच्या घराजवळील पाठीमागील बाजूस असलेल्या खोलीत छापा टाकला. या छाप्यात आरोपी किरण लक्ष्मण सासणे यास ताब्यात घेण्यात आले आणि त्याच्याकडून १७७ लिटर सिंधी ताडी-माडी आणि रॉयल स्टॅग डिलक्स विदेशी दारूच्या ३० बाटल्या असा एकूण ५८,६००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

जप्त केलेला मुद्देमाल आणि आरोपी यास पुढील कायदेशीर कारवाईसाठी गांधीनगर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहे. ही यशस्वी कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. सो, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. धीरजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुशांत चव्हाण, स.हा.पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस अंमलदार अमित मरदने, रामचंद्र कोळी, वसंत पिंगळे, प्रवीण पाटील, रूपेश माने, विनोद कांबळे, आणि योगेश गोसावी यांनी पार पाडली. कोल्हापूर पोलिसांनी अवैध व्यवसायांविरोधात सुरू केलेली ही मोहीम यापुढेही अधिक तीव्र केली जाईल, अशी ग्वाही पोलीस अधीक्षकांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button