महत्त्वाच्या मागणीसाठी पत्रव्यवहार: जिजाऊ ब्रिगेड, कोल्हापूर

कोल्हापूर (सलीम शेख) : कोल्हापूर जिजाऊ ब्रिगेड, कोल्हापूर जिल्हा शाखेने पुणे येथील महात्मा फुले वाडा भाडेतत्त्वावर शासनाधीन करण्याच्या मागणीसाठी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांना एक निवेदन सादर केले आहे.जिजाऊ ब्रिगेडच्या कोल्हापूर जिल्हा अध्यक्षा चारुशीला पाटील यांनी स्वाक्षरी केलेल्या या निवेदनानुसार, पुणे येथील महात्मा फुले वाडा हा ऐतिहासिक ठेवा असून, त्याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळाला पाहिजे. महात्मा फुले वाडा हा महात्मा आणि सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्याचा साक्षीदार आहे.सध्या हा वाडा भाडेतत्त्वावर असून, याच्या मालकी हक्काबाबत संभ्रम आहे. जिजाऊ ब्रिगेडला या वाड्यात कोणतेही सामाजिक, शैक्षणिक, किंवा सांस्कृतिक कार्यक्रम करण्यासाठी कोणत्याही व्यक्तीची किंवा संस्थेची परवानगी घ्यावी लागू नये. या वाड्यावर सर्वांना समान हक्क असावा.वाड्याचा आदर राखण्यासाठी व तो सर्वांसाठी खुला करण्यासाठी तो त्वरित शासनाधीन सरकारी ताब्यात करावा.
निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की, जर शासनाने या मागणीकडे लक्ष दिले नाही, तर जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्र भर आंदोलन सुरू करेल.यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या चारुशीला पाटील, सुमन वागळे, रंजना पाटील, दिपाताई कोकाटे, कल्पना देसाई, प्राजक्ता आंबले उपस्थित होत्या.



