Uncategorizedमहाराष्ट्र ग्रामीण

नेर्लीतील गुरुदत्ता फाउंड्रीजजवळ भीषण अपघात! सरकारी अधिकाऱ्याचा मृत्यू, ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

गोकुळ शिरगाव (इरफान मुल्ला ): नेर्ली येथील गुरुदत्ता फाउंड्रीसमोर दुपारी झालेल्या भीषण अपघातात राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या कोल्हापूर उपक्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी सिद्धार्थ सिंह यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेने प्रशासन व नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. प्राप्त माहितीनुसार, कामानिमित्त दुचाकीवरून तामगावकडे जात असताना त्यांच्या दुचाकीला (क्र. MP28 ME 8366) मागून भरधाव डंपर ट्रक (क्र. MH 07 C 6125) ने जोरदार धडक दिली. या धडकेत मागील सीटवर बसलेले अधिकारी गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यूमुखी पडले, तर दुचाकी चालकाला किरकोळ दुखापत झाली.

अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पसार झाला. तक्रारीनुसार, ट्रकचालकाने वाहन निष्काळजीपणे व वेगमर्यादा न पाळता चालवले होते. तसेच अपघातानंतर कोणतीही मदत न पुरविता पळ काढल्याचा आरोप करण्यात आला आहे. गोकुळ शिरगाव पोलिसांनी संबंधित ट्रकचालकाविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास गोकुळ शिरगाव पोलीस ठाणे अंमलदार  करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button