मुरगूड नगरपरिषद निवडणूक : प्रभाग ९ अ मधून उबाठा गटाच्या सौ. सपना कांबळे ‘मशाल’ चिन्हावर रिंगणात!

मुरगूड (बाळासो कांबळे ): आगामी मुरगूड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ मध्ये प्रभाग क्रमांक ९ अ मधून उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) गटाच्या अधिकृत उमेदवार सौ. सपना अक्षय कांबळे यांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे. त्यांचे निवडणूक चिन्ह ‘मशाल’ असून, त्यांनी मतदारांना मशाल चिन्हासमोरील बटण दाबून प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, सौ. सपना कांबळे यांनी एका महत्त्वपूर्ण निवेदनात स्पष्ट केले आहे की, “मुरगूड नगरपरिषद निवडणुकीत आम्ही कोणत्याही उमेदवाराला पाठींबा दिलेला नाही. याबद्दल पसरवल्या जाणाऱ्या अफवांना मतदारांनी बळी पडू नये. पाठींब्याच्या बातमी किंवा अफवांमध्ये कोणतेही तथ्य नाही.”
सतत सामाजिक कामांमध्ये सक्रिय असलेले अक्षय सुनील कांबळे यांच्या पत्नी असलेल्या सौ. सपना कांबळे यांनी समाज हिताचा ध्यास घेतला असून, उबाठा गटाकडून मिळालेली उमेदवारी सार्थकी लावण्यासाठी त्या जिवाचे रान करत आहेत.
निवडून आल्यास प्रभाग ९ अ मध्ये पुढीलप्रमाणे कामे करण्याची त्यांची तयारी आहे:
-
महिलांसाठी रोजगार: प्रभागातील बेरोजगार महिलांसाठी गारमेंट उद्योगासारखे रोजगार उपलब्ध करून देणे.
-
युवकांसाठी संधी: तरुण उच्चशिक्षित युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे.
-
प्रभागाचे सुशोभीकरण: परिसराचे सुशोभीकरण करणे.
-
पेन्शन योजना: अपंग, दिव्यांग आणि वयोवृद्ध लोकांसाठी पेन्शन योजना राबवणे.
-
शासकीय कागदपत्रे: रेशन कार्ड, आधार कार्ड, आयुष्यमान कार्ड यासह नागरिकांची सर्व शासकीय व निमशासकीय कागदपत्रांची कामे पूर्ण करून देणे.
-
घरकुल योजना: घरकुल योजनेचा लाभ गरजू आणि शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे.
सौ. कांबळे यांनी स्पष्ट केले आहे की, उबाठा पक्षाकडून वेळोवेळी येणाऱ्या आदेशांचे पालन करण्यासाठी त्या नेहमी तत्पर असतील. पक्षनिष्ठा प्रथम ठेवून समाजकार्य आणि समाजातील कामांसाठी त्या कायम अग्रेसर राहतील. त्यांनी मतदारांना विनम्र विनंती केली आहे की, केवळ ‘मशाल’ या चिन्हासमोरील बटण दाबून त्यांना विजयी करावे.




