महाराष्ट्र ग्रामीण

गोकुळ शिरगावमध्ये सराफी दुकानावर डल्ला; २५ लाखांहून अधिकचा मुद्देमाल लंपास!

गोकुळ शिरगाव(इरफान मुल्ला) : गोकुळ शिरगावमधील एका प्रसिद्ध सराफी दुकानात दोन अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. चोरट्यांनी दुकानातून १९ तोळे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण २५ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. याप्रकरणी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रकाश आनंदराव भोसले (वय ६५) यांचे गोकुळ शिरगाव येथील मेन रोडवर ‘गुरव गल्ली’ परिसरात सोन्याचे दुकान आहे. मंगळवारी, २४ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ८:०० वाजेच्या सुमारास प्रकाश भोसले हे आपले दुकान बंद करून घराकडे निघाले असताना, दोन अज्ञात चोरट्यांनी संगनमत करून त्यांच्याकडील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असलेली बॅग जबरदस्तीने चोरून नेली.
चोरट्यांनी लंपास केलेल्या मुद्देमालामध्ये विविध प्रकारच्या सोन्याच्या दागिन्यांचा समावेश आहे.
सोन्याचे दागिने १९ तोळे ८ ग्रॅम वजनाचे दागिने याची एकूण किंमत सुमारे २३ लाख ७६ हजार रुपये आहे. १ लाख ६० हजार रुपये रोख रक्कम, मिळून एकूण रक्कम २५ लाख ३६ हजार रुपयांची चोरी झाली आहे
या घटनेनंतर फिर्यादींनी तातडीने गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी दिलेल्या फिर्यादी नुसार गुन्हा नोंदवला या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेख करत आहेत.
परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेजच्या आधारे चोरट्यांचा माग काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. भरवस्तीत झालेल्या या चोरीमुळे स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button