महाराष्ट्र ग्रामीण

महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाची थकीत कर्जाची वसुली तात्काळ थांबवून कर्जमाफी करा-सतिश माळगे!

कोल्हापूर (प्रतिनिधी- : बाळासो कांबळे) महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाच्या मार्फत अनुसूचित जातीतील दुर्बल घटकांना व्यवसायासाठी थेट कर्ज तसेच बीज भांडवल योजने अंतर्गत कर्जवाटप केले जाते या महामंडळामार्फत NSFDC कडून १ लाख,२ लाख,३ लाख,४ लाख आणि ५ लाख असे कर्ज महामंडळाच्या अंतर्गत मागील तीन ते चार वर्षा पाठीमागे कोरोना संपल्याच्या नंतर बाजारपेठ पूर्ण मंद असताना संत गतीने असताना कोरोना काळाच्या नंतर विविध व्यवसायासाठी कर्ज वित्रीत करण्यात आले होते संपूर्ण देश कोरोनाच्या विळख्यातून सावरत असताना सर्व व्यापाऱ्यांच्या मध्ये तसेच नवीन व्यवसायिकांमध्ये मंदीचे सावट असताना नवीन व्यवसाय सुरू केल्याने अनेक व्यवसायिकांचे मिळालेले पैसे हे विविध आजारपनामध्ये तसेच कोरोनामध्ये कुटुंबीयांच्या देखबालासाठी आणि दवापाण्याकरता खर्च झाल्याने कर्ज घेतलेल्या अनेक व्यवसायिकांना कोरोनाचा फटका बसला असल्याकारणाने महामंडळाकडून बऱ्याच थेट कर्ज घेतलेल्या व्यवसायिकांचे कर्ज अद्याप थकीत आहे व्यवसाठी बाजारपेठ स्थिर नसल्याने अनेक व्यवसाय हे बंद स्वरूपात तसेच मोडकळीस आलेले आहेत असे असताना अशातच महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाकडून या थकीत कर्जदारांकडे सक्तीची वसुली केली जात आहे ही वसुली अन्यायकारक असून या वसुलीस तात्काळ स्थगिती देऊन थांबवण्यात यावे शेतकऱ्यांना प्रत्येक दोन वर्षातून एकदा कर्ज माफी दिली जाते.

धनदांडगे उद्योजक,साखरकारखानदारांचे हाजारो कोटींचे कर्जे माफ केली जातात पण शेतामध्ये मोलमजुरी करून शेतमजुरी करून आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करणाऱ्या दलित,वंचित,उपेक्षीत मजूर मागासवर्गीय कुटुंबातील समूहाला याचा कोणताही लाभ होत नाही जरी महामंडळाकडून अनुसूचित जातीतील दुर्बल घटकांना व्यवसायासाठी थेट कर्ज दिले असले तरी सामाजिक न्यायचा हा सर्व निधी या मागासवर्गीय घटकांना याचा लाभ व्हायला हवा पण असं न होता राज्य शासन आपल्या सोयीनुसार सामाजिक न्याय खात्याचा निधी हा इतरत्र वळवून त्याचा गैरफायदा घेत आहे मग मागासवर्गीय कुटुंबाने कोणाकडे न्याय मागायचा असा प्रश्न अनुसूचित जातीतील दुर्बल घटकांना पडला आहे व्यवसाय मोडखळीस असताना ही सक्तीची वसुली कशासाठी असा सवाल यावेळी रिपब्लिकन पक्षाचे कोल्हापूर जिल्ह्याचे सचिव सतीश माळगे यांनी केला आहे ही सक्तीची वसुली तात्काळ थांबवा तसेच ज्या पद्धतीने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाते धनदांडग्या उद्योजग तसेच साखरकारखानदारांचे हाजारो कोटींची कर्जे माफ करतात त्याच पद्धतीने मागासवर्गीय महामंडळाची ही कर्जमाफी तात्काळ करा महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाला बीज भांडवल योजनेसाठी पाच लाखाची मर्यादा असून त्याची मर्यादा पाच लाखाहून दहा लाखापर्यंत करा तसेच इतर महामंडळाप्रमाणेच याही महामंडळाला बीज भांडवल योजनेअंतर्गत व्यवसायासाठी दिले जाणाऱ्या कर्जासाठी व्याजमुक्त कर्जवाटप करा अशा आणि विविध मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले)कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने दिनांक 19 रोजी मित्तल टॉवर मुंबई येथे असलेल्या महात्मा फुले मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळाच्या ऑफिसमध्ये व्यवस्थापकीय संचालक MD मा.बेलदार साहेब यांना निवेदनाद्वारे मागण्या करण्यात आल्या या मागण्या आपण शासन दरबारी पाठवून संबंधित मागण्यांच्या पाठपुरावा तात्काळ करून या अनुसूचित जातील दुर्बल घटकांना न्याय द्यावा अन्यथा महामंडळ तसेच राज्य शासनाच्या विरोधात विविध पद्धतीने कर्जमाफी होत नाही तोपर्यंत रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आम्ही तिव्रआंदोलनात्मक लढा देत राहू असे रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा सचिव सतीश माळगे यांनी मागणी केली आहे यावेळी रिपब्लिकन पक्षाचे राधानगरी तालुक्याचे कुंडलिक कांबळे, होलार आघाडीचे लक्ष्मण पारसे (अण्णा)’महेश कांबळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button