चिखली: कन्या विद्या मंदिरच्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी सौ. अनुराधा कांबळे यांची ऐतिहासिक निवड

चिखली (बाळासो कांबळे): चिखली येथील ऐतिहासिक नगरीतील ‘कन्या विद्या मंदिर, चिखली’ शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीची नूतन निवड प्रक्रिया नुकतीच उत्साहात पार पडली. या निवडीमध्ये सौ. अनुराधा प्रदिप कांबळे यांची समितीच्या प्रथम महिला अध्यक्षा म्हणून निवड करून इतिहास घडवण्यात आला आहे. त्यांच्यासोबतच उपाध्यक्षपदी विद्या मगदूम यांची बिनविरोध निवड करण्यात आली. शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी आणि विद्यार्थिनींच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी ही समिती यंदा पूर्णतः बिनविरोध निवडली गेली, हे विशेष. या नूतन कार्यकारिणीत गावातील विविध क्षेत्रांतील कार्यक्षम व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे.
शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यपदी पुढील मान्यवरांची निवड झाली आहे:
(१) रेश्मा नजीर नाईक (सदस्या)
(२) सचिन गंगाधर सूर्यवंशी (सदस्य)
(३) वरूनकुमार वसंत गुरव (सदस्य)
(४) विद्या भारत मगदूम (सदस्या)
(५) अमितसिंग अनंतसिंग काईत (सदस्य)
(६) सुशांत बाळू गळतगे (सदस्य)
(७) सावित्री दयानंद पाटील (सदस्या)
(८) कमल प्रकाश चौगुले (सदस्या)
चिखलीच्या शैक्षणिक इतिहासात प्रथमच एका महिला अध्यक्षांची निवड झाल्यामुळे महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने हे एक मोठे पाऊल मानले जात आहे. नूतन अध्यक्षा सौ. अनुराधा कांबळे आणि उपाध्यक्ष विद्या मगदूम यांच्यासह सर्व नूतन सदस्यांचे सर्व विद्यार्थिनी, पालक वर्ग आणि चिखली ग्रामस्थांच्या वतीने मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे. शाळेच्या प्रगतीसाठी ही नूतन समिती जोमाने कार्य करेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.




