गोकुळ शिरगावात साडेतीन वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार; परप्रांतीय आरोपीला अटक

गोकुळ शिरगाव (सलीम शेख ) : गोकुळ शिरगाव येथील रविवारी दुपारी साडेबारा वाजता एक अत्यंत धक्कादायक घटना घडली. एका साडेतीन वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती समोर आली असून, या प्रकरणी गोकुळ शिरगाव पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत ५८ वर्षीय मदन मोहन हजरा या आरोपीला अटक केली आहे. तो मूळचा पश्चिम बंगालचा रहिवासी असून, काही काळापासून गोकुळ शिरगाव परिसरात वास्तव्य करत होता.आरोपी मदन मोहन हजरा हा पीडित मुलीच्या कुटुंबाशी परिचित होता.रविवारी दुपारी त्याने मुलीला घराशेजारील बांधकामस्थळी फुस लावून नेले.
त्या ठिकाणी कोणी नसल्याचा फायदा घेत त्याने मुलीवर अत्याचार केला.काही तासांनंतर मुलीने घडलेली घटना आईला सांगितली, त्यानंतर परिसरात खळबळ उडाली.संतप्त नागरिकांनी आरोपीला पकडून चोप दिला आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.मुलीच्या आईने गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली दिली .नंतर पोलिसांनी गंभीर दखल घेत आरोपीविरुद्ध पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा नोंदवून अटक केली आहे.आरोपीला न्यायालयात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.या घटनेनंतर गोकुळ शिरगाव परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांनी अशा गुन्हेगारांना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली असून, मुलीच्या कुटुंबाला मानसिक आधार देण्याची गरज व्यक्त केली आहे.