पोलीस आणि सैनिकांसाठी मोफत दंत तपासणी शिबिर संपन्न

साळवण (सलीम शेख ): देशाचे रक्षण करणाऱ्या पोलीस आणि सैनिकांसाठी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून १५ ऑगस्ट रोजी मोफत दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सह्यगिरी परिवार आणि गगनगिरी दातांचा दवाखाना यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर साळवण येथील डॉ. परिमल चोपडे यांच्या दवाखान्यात पार पडले.
या शिबिरात आजी-माजी सैनिक, पोलीस आणि पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच त्यांच्या दातांची मोफत तपासणी करण्यात आली. भरतीसाठी आवश्यक असलेल्या दंत आरोग्याविषयी विशेष मार्गदर्शन करण्यात आले. शिबिरात सहभागी झालेल्यांना दंत उपचारांमध्ये विशेष सवलतही देण्यात आली.
यावेळी डॉ. परिमल चोपडे यांनी शिबिराच्या आयोजनामागील उद्देश स्पष्ट केला. माजी सैनिक संपत सूर्यवंशी, तिसंगी गावाचे जाधव, सुधीर डकरे, सह्यगिरी परिवाराचे रघुनाथ शिंदे, क्रांतिसिंह सावंत, नामदेव खाडे, मंडलिक आणि जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.