गोकुळ शिरगाव येथे ७९ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा!

गोकुळ शिरगाव (सलीम शेख) : छत्रपती शाहू महाराज नगर, गोकुळ शिरगाव येथील मौलाना अबुल कलाम आझाद वसाहत येथे व्हॉइस ऑफ युथ आणि सुन्नत मुस्लिम जमात आझादनगर यांच्या संयुक्त विद्यमाने भारताचा ७९ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्याला परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून गोकुळ शिरगावचे कांदा-बटाटे व्यापारी मनोहर शेळके आणि कणकवली, सिंधुदुर्ग येथील माजी उपप्राचार्य पी. व्ही. कांबळे सर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
ध्वजारोहणानंतर देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. उपस्थितांनी “भारत माता की जय” आणि “वंदे मातरम” च्या घोषणांनी संपूर्ण वातावरणात चैतन्य निर्माण केले. या सोहळ्यात परिसरातील ज्येष्ठ नागरिक, शाळकरी मुले आणि महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी व्हॉइस ऑफ युथ आणि सुन्नत मुस्लिम जमात आझादनगर यांनी परिश्रम घेतले. या माध्यमातून सामाजिक एकोपा आणि राष्ट्रभक्तीचा संदेश देण्यात आला.