कमल पिल्ली चारिटेबल ट्रस्ट आणि बीएम ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने गरीब आणि गरजू महिलांना साडी आणि अन्नधान्याचे वाटप!

कोल्हापूर (प्रतिनिधी) : रमणमळा येथील दत्त मंदिरात शनिवार दिनांक १६ ऑगस्ट २०२५ रोजी कमल पिल्ली चारिटेबल ट्रस्ट आणि बीएम ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने गरीब आणि गरजू महिलांना साडी आणि अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम बीएम ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष श्री. भैरू मोरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमात कमल पिल्ली चारिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश मल्ली आणि दीपा मल्ली, बीएम राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष दत्ता पाटील (वस्ताद), दादाश्री प्रतिष्ठानचे सागर शिंदे, तसेच योगेश शहा, नितीन भिसे सर, पप्पू भानुसे, आदित्य जाधव, ओमकार जाधव प्रशांत पाटील सुनील तोडकर विशाल येडगे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी गरजूंना साड्या आणि शिधा वाटप करण्यात आले. तसेच, श्री. भैरू मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्य आणि वह्यांचे संकलनही करण्यात आले, जे गरजू विद्यार्थ्यांना वाटले जाणार.