सुर संगीत स्टुडिओचा पहिला वर्धापन दिन उत्साहात साजरा

कागल (सलीम शेख) : हिदायत प्रेझेंट्स, सुर संगीत कराओके सिंगिंग स्टुडिओ, कागलच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त ‘सदाबहार हिंदी-मराठी गीतांची मैफिल’ हा कार्यक्रम शुक्रवार, १५ ऑगस्ट २०२५ रोजी उत्साहात पार पडला. शहरातील श्री राम मंदिर, खर्डेकर चौक येथे सायंकाळी ६ वाजता हा कार्यक्रम झाला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून झाली. स्टुडिओचे सदस्य नासिर नाईक यांनी उपस्थितांचे स्वागत केले. त्यानंतर स्टुडिओचे संस्थापक हिदायत नायकवडी यांनी ‘जहाँ डाल डाल पर’ हे देशभक्तीपर गीत सादर करून कार्यक्रमाची सुरुवात केली.
या मैफिलीत स्टुडिओमधील गायक इरफान खलीफ, प्रशांत रेडेकर, राज शेख, विलास कांबळे, नासिर नाईक, बी.वाय.कांबळे सर, राजु कांबळे, सुनिल बोते, संदीप कांबळे, संपत माने सर, विनायक गोंधळी, मनिषा गोंधळी, कविता भोसले, दिपा माने, विद्या दिवटे मॅडम आणि अमर कदम यांनी एकापेक्षा एक सरस गाणी सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नासिर नाईक यांनी केले. ध्वनी व्यवस्था ‘NA-AUDIOTUCH’ अभिजीत काटकर व बाबासाहेब पाटील यांनी सांभाळली, तर कार्यक्रमाची सजावट शकील व इजाज नायकवडे यांनी केली. या कार्यक्रमाला कागल आणि परिसरातील संगीतप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.