दिव्यांग्याच्या सामाजिक उन्नतीसाठी सामाजिक संस्थांचे योगदान दिशादर्शक : राघवेंद्र आणवेकर
हेल्पर्स ऑफ दी हॅण्डिकैप्ड संस्थेत मोफत प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन

गोकुळ शिरगाव (प्रतिनिधी) दिव्यांग युवक-युवतीच्या सर्वांगीण व सामाजिक उन्नतीसाठी समाजाने पाठबळ द्यावे. दिव्यांगाच्या सक्षमीकरणाचे व प्रशिक्षित करण्याचे उपक्रम दिशादर्शक आहेत. असे प्रतिपादन एकलव्य अवॉर्ड , राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते व
राणी चनम्मा विद्यापीठ बेळगांवीचे राघवेंद्र आणवेकर यांनी केले.
उचगाव (ता. करवीर) येथील हेल्पर्स संस्था उचगाव येथे मोफत दिव्यांग सक्षमीकरण कौशल्ये विकास प्रशिक्षण शिबीर उद्घाटन प्रसंगी ते बोलत होतें. अध्यक्षस्थानी हेल्पर्सचे उपाध्यक्ष मनोहर देशभ्रतार होते.
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळचे कामगार कल्याण अधिकारी मा. विजय शिगाडे, कामगार कल्याण केंद्र संचालक, संघसेन जगतकर, महिला कल्याण संस्थेचे अध्यक्ष एम एस चौगुला यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते ४५ दिवसाचे निवासी मोफत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थीना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले तर नवीन बॅचचे हस्ते उदघाटन करण्यात आले.या प्रसंगी ए पी डी संस्था, महिला कल्याण संस्था, युवा ग्रामीण विकास संस्था, हेल्पर्स संस्थेकडून सुरू असलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाविषयी पालकांनी व प्रशिक्षणार्थीनी कौतुक केले.
या कार्यक्रमास महिला कल्याण संस्थेच्या सौ. सुलोचना भट्ट, कृष्णा कॉलेज कराडचे डीन डॉ. वरदराज्यू, डॉ. एस. आनंद , डॉ. सत्यम बुधाजी हेल्पर्सचे विश्वस्त तानाजी देसाई, सुजाता गारे, नीता देशभ्रतार , सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा पाटील, किरण चौगुला, प्रकल्प व्यवस्थापक मोहन सातपुते, ताहीर वाडकर, प्रशिक्षक प्रद्या मगर, निखिल बनसोडे, विराज स्वामी उपस्थित होते.सूत्रसंचालन अश्विनी पाटील व पारस शिंदे यांनी केले. प्रास्ताविक सुरेखा पाटील यांनी केले.
आवाहन: प्रत्येक बँच मध्ये ३० दिव्यांग युवक-युवतीना ४५ दिवसाचे मोफत निवासी प्रशिक्षण सुरू आहे.येथून प्रशिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या दिव्यांग युवक-युवतीना त्यांच्या कौशल्यानुसार रोजगार उपलब्ध करून द्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.