महाराष्ट्र ग्रामीण

बोरपाडळे येथील संजीव औद्योगिक सहकारी संस्थेवर अनियमिततेचा आरोप!

कोल्हापूर (सलीम शेख ) : बोरपाडळे येथील संजीव औद्योगिक सहकारी संस्था, बोरपाडळे (गट नं. ४५०) यांच्यावर लोकशाही संघर्ष सेनेचे संस्थापक अध्यक्ष धनाजी सकटे यांनी गंभीर आरोप केले आहेत. संस्थेने नियमांचे उल्लंघन करून चुकीच्या पद्धतीने ठराव मंजूर केल्याचा दावा सकटे यांनी केला आहे. या संदर्भात, त्यांनी १९ ऑगस्ट २०२५ रोजी उपनिबंधक कार्यालयात निवेदन सादर केले असून, दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
लोकशाही संघर्ष सेनेच्या म्हणण्यानुसार, ३० एप्रिल २०२३ रोजी संस्थेने आपल्या कार्यालयात चुकीचा ठराव सादर केला. या ठरावात २४५ पैकी १५२ सदस्यांना . उपनिबंधक कार्यालयाने कोणतीही सखोल चौकशी न करता या ठरावाला मान्यता दिली, असे सकटे यांचे म्हणणे आहे.
यानंतर जेव्हा संस्थेची निवडणूक लागली, तेव्हा कलम ४० [क] नुसार काही उमेदवारांना अपात्र ठरवून त्यांना निवडणुकीपासून वंचित ठेवले गेले. सकटे यांचा आरोप आहे की, सहकारी अधिकारी संस्थेतील भ्रष्टाचार लपवण्यासाठी आणि संस्थेला वाचवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहेत. या कलमाखालील सह्यांमध्ये अनेक मृत व्यक्तींच्या सह्यांचा समावेश असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.
धनाजी सकटे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांच्या संघटनेने याआधीही या संस्थेतील अनियमिततेबाबत अनेकवेळा निवेदन दिले आहे, पण उपनिबंधक कार्यालयाने कोणतीही चौकशी केलेली नाही. या प्रकाराला त्यांनी पन्हाळा येथील सहनिबंधकांनी खतपाणी घातल्याचा आरोप केला आहे.
जर उपनिबंधक कार्यालयाने ३० एप्रिल २०२३ चा ठराव रद्द करून पुन्हा निवडणूक जाहीर केली नाही, तर २५ ऑगस्ट २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन किंवा उपोषण केले जाईल. यामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास संबंधित कार्यालय, जिल्हा उपनिबंधक आणि संस्था जबाबदार राहतील, असा इशाराही सकटे यांनी दिला आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button