विद्या मंदिर कोनोली तर्फ असंडोली शाळेत रोटरी क्लबच्या वतीने साहित्य वाटप!

गारीवडे (प्रतिनिधी) : विद्या मंदिर कोनोली तर्फ असंडोली शाळेत रोटरी क्लब ऑफ कोल्हापूरच्या ५१व्या वर्षानिमित्त विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमात केतन मेहता, विकास राऊत आणि राजेश काजवे यांच्या आर्थिक सहकार्याने सर्व विद्यार्थ्यांना इंग्रजी अंकलिपीचे वाटप करण्यात आले.
निवृत्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अमोल देशपांडे, त्यांच्या पत्नी भाग्यश्री देशपांडे आणि कन्या आदिती रास्ते यांच्या तर्फे शाळेसाठी एक लॅपटॉप व एक मोठा कुलर देण्यात आला. योगेश अडसुळे यांनी ८ ट्युबलाईट संच तर नितीन बाचुलकर यांनी ४ खुर्च्यांचे योगदान दिले.हे सर्व साहित्य मुख्याध्यापक आर. एस. भाटले, शिक्षक वृंद, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष ज्ञानदेव पाटील आणि सिद्धेश कुपले यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात आले. कार्यक्रमात रोटरॅक्ट क्लबचे अजय चव्हाण, सचिन माने, अमर शेरवाडे, संदीप सुतार आणि अभिजित आचरेकर हे मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात आर. एस. भाटले यांच्या प्रास्ताविकाने झाली. यानंतर अमोल देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना न्यायव्यवस्थेचे महत्त्व आणि कार्यपद्धती याबाबत मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन सुहास पाटील यांनी केले. कार्यक्रमाला आनंदा पाटील, सदाशिव अस्वले, नंदा जाधव आणि पूजा पाटील यांची उपस्थिती होती. आभार प्रदर्शन डी. एस. पाटील यांनी केले.
हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरला.