कणेरीतून सव्वादोन लाखांचे साहित्य लंपास!

कणेरी (इरफान मुल्ला) : कणेरी येथील शिंदे कॉलनीमध्ये चोरट्यांनी २ लाख २१ हजार रुपयांचे बांधकाम साहित्य (सेंट्रिंग) चोरून नेले. ही घटना मंगळवारी उजेडात आली असून, या प्रकरणी गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अजित कदम (वय २२, रा. व्हीनस कॉर्नर, कोल्हापूर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा आणि त्यांच्या भावाचा बंगला कणेरीतील दत्त कॉलनीमध्ये बांधला जात आहे. या बांधकामासाठी आवश्यक असलेले २ लाख २१ हजार रुपयांचे सेंट्रिंग साहित्य गेल्या अनेक दिवसांपासून बांधकाम सुरू असलेल्या जागेसमोर उघड्यावर ठेवले होते.
मंगळवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी हे सर्व साहित्य पळवून नेले. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. या चोरीमुळे बांधकाम व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेमुळे बांधकामस्थळावरील साहित्याची सुरक्षितता हा एक महत्त्वाचा प्रश्न बनला आहे.