महाराष्ट्र ग्रामीण

गोकुळ शिरगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी संदीप पाटील (बोरुडे) यांची निवड!

कोल्हापूर (प्रतिनिधी ): गोकुळ शिरगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी संदीप पाटील (बोरुडे) यांची निवड झाल्याने त्यांच्या समर्थकांनी गुलाल लावून आनंद व्यक्त केला. मात्र, ही निवड बिनविरोध करण्याच्या ठरले असताना अचानक विरोधी अर्ज भरल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदासाठी झालेल्या बैठकीत, यापूर्वीच्या सर्व उपसरपंचपदाच्या निवडींप्रमाणे यावेळीही निवड बिनविरोध करण्याचा निर्णय सर्व सदस्यांनी आणि सरपंचांनी घेतला होता. त्यानुसार, उपसरपंचपदासाठी सौ. अश्विनी कांबळे यांचे नाव निश्चित करण्यात आले होते. मात्र, ऐनवेळी संदीप पाटील यांनी कांबळे यांच्या विरोधात अर्ज दाखल केला. यामुळे बिनविरोध निवडणुकीचा निर्णय अचानक बदलला आणि कांबळे यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरली.

कांबळे यांच्या समर्थकांनी यावेळी असा प्रश्न उपस्थित केला की, “यापूर्वीच्या उपसरपंचपदाच्या निवडी बिनविरोध झाल्या, तेव्हा सौ कांबळे यांनी सर्वांना सहकार्य केले. मग, सौ. कांबळे यांच्या निवडीच्या वेळीच त्यांनी निवडणूक का लावली? त्यांना जाणूनबुजून डावलले जात आहे का?” यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.

अखेरीस, मतदानानंतर संदीप पाटील यांची उपसरपंचपदी निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. या अचानक बदललेल्या भूमिकेमुळे सौ. कांबळे यांचे समर्थक नाराज झाले असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.

यावेळी बाबुराव पाटील, महादेव पाटील, पांडुरंग पाटील, भगवान कदम, सुरज पवार, प्रकाश सातपुते, सतीश एरंडोले, संतोष पाटील, रघुनाथ पाटील, सुधाकर पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच, ग्रामपंचायत सदस्य आणि परिसरातील नागरिकांनी संदीप पाटील यांचे अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button