महाराष्ट्र ग्रामीण

गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याकडून रूट मार्च!

गोकुळ शिरगाव (सलीम शेख ‌) : आगामी गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद (ईद-ए-मिलादुन-नबी) सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याने गोकुळ शिरगाव, कंदलगाव, उजळाईवाडी आणि कणेरी या गावांमध्ये रूट मार्च काढला. हा रूट मार्च दिनांक २२/०८/२०२५ रोजी दुपारी २:३० ते सायंकाळी ५:०० या वेळेत पार पडला.


या रूट मार्चचा मुख्य उद्देश नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे, तसेच संभाव्य शांतता भंग करणाऱ्या घटनांना आळा घालणे हा होता. या काळात मिरवणूक मार्गांची पाहणी करण्यात आली. विशेषतः कणेरी आणि उजळाईवाडी या गावांमध्ये दंगल नियंत्रण (Riot Control) प्रात्यक्षिक सादर करण्यात आले, ज्यामुळे पोलिसांच्या तयारीची चाचपणी झाली.
या रूट मार्चमध्ये सहा. पोलीस निरीक्षक टी. जे. मगदूम यांच्यासह एकूण ४ अधिकारी, ९ अंमलदार आणि मुख्यालयाकडील एक आरसीपी (Rapid Action Force) प्लाटून सहभागी झाली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button