महाराष्ट्र ग्रामीण
कणेरी येथे बांधकाम साहित्याची चोरी उघडकीस

कणेरी (इरफान मुल्ला ) : कणेरी येथे सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणाहून सेंट्रिंग साहित्य चोरीला गेल्याची तक्रार दत्तात्रय कदम (कोल्हापूर) यांनी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात केली होती.
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत राजेश प्रभाकर अनलगे, वय ४० (रा. इंदिरानगर, सोलापूर) या आरोपीला २३ ऑगस्ट २०२५ रोजी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान, त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
पोलिसांनी त्याच्याकडून १३,२१० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक धीरजकुमार बच्चू, उपविभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर, सहाय्यक पोलीस निरीक्षक टी. जे. मगदूम, तसेच संदेश कांबळे, नितेश कांबळे, भरत कोरवी आणि संदेश पवार यांच्या पथकाने केली.