महाराष्ट्र ग्रामीण
वाढदिवसाच्या शुभक्षणी मान्यवरांची उपस्थिती!

कोल्हापूर (सलीम शेख) : राज्याचे कर्तबगार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे ओ.एस.डी अमित हुक्केरी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या विशेष दिवशी त्यांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देण्यात आल्या.आमदार चंद्रदीप नरके, माजी आमदार सुजित मिणचेकर ,शिवसेना कोल्हापूर जिल्हा समन्वयक सत्यजित (नाना) कदमतसेच इतर मान्यवर, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.या प्रसंगी सर्वांनी अमित हुक्केरी यांना दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि यशस्वी सार्वजनिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात सौहार्दपूर्ण वातावरणात संवाद साधण्यात आला आणि सामाजिक एकतेचा संदेश देण्यात आला.
हुक्केरी यांचे कार्यक्षेत्रातील योगदान आणि जनसेवेतील सक्रियता यामुळे त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. कार्यक्रमाचे आयोजन साधेपणात पण उत्साहात पार पडले.