गगनबावडा तालुक्यातील वेतवडे येथे विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा नागरी सत्कार सोहळा संपन्न!

कोल्हापूर गगनबावडा (सलीम शेख ) : वेतवडे येथील सह्यगिरी परिवार आणि ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या नागरी सत्कार सोहळ्यात सहकार, शिक्षण, शरीरसौष्ठव आणि साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला.
या विशेष कार्यक्रमात, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी निवड झाल्याबद्दल जी.एम. शिंदे, दुबईतील सर्वात मोठ्या जिममध्ये प्रशिक्षक म्हणून निवड झाल्याबद्दल क्रांतिसिंह कृष्णात शिंदे, महाराष्ट्र शासनाच्या भातशेती स्पर्धेत राज्यात तिसरा क्रमांक पटकावल्याबद्दल आनंदा आढाव, ‘झांजडझगडा’ या कवितासंग्रहासाठी पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल कवी विक्रम राजवर्धन आणि बारावीच्या सीईटी परीक्षेत उत्कृष्ट यश मिळवल्याबद्दल कश्मीरा शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.
हा सत्कार सोहळा कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी चेअरमन पी.जी. शिंदे, सांगली पाटबंधारे विभागाचे उपअभियंता प्रदीप शिंदे, एम.पी. शिंदे, नारायण सखाराम शिंदे, आणि तुकाराम राजाराम शिंदे यांच्या हस्ते पार पडला.
या सोहळ्यादरम्यान, ओंकार भजनी मंडळाला पारंपरिक गणवेशाचे वाटपही करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संजय शिंदे यांनी प्रास्ताविकेत सह्यगिरी परिवाराच्या या उपक्रमाचा उद्देश स्पष्ट केला.
या प्रसंगी सह्यगिरीचे संस्थापक रघुनाथ शिंदे, एकनाथ शिंदे, नामदेव शिंदे, शिवाजी विठ्ठल शिंदे, संदीप बळीराम शिंदे, संदीप गुंजवटे, अशोक शिंदे, संजय आढाव, महादेव कांबळे, राजेश पवार, सखाराम राजाराम शिंदे, दिलीप शिंदे, गंगाराम शिंदे, कुंडलिक शिंदे, बाजीराव शिंदे आणि संभाजी शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.




