मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी इंगळी आंदोलक मुंबईला गनिमी काव्याने दाखल

इंगळी (सलीम शेख ) : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाज इंगळी आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांच्या वतीने इंगळी गावात आंदोलक मुंबईला पोचले. हे उपोषण मुंबई शहरातील आझाद मैदानावर सुरू आहे. शिवसेना शहर प्रमुख केशव नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलनाला मुंबईत पोचले.
या उपोषणात सकल मराठा समाज इंगळीचे अध्यक्ष आणि आनंदा पाटील, तसेच नागरिक अर्जुन चव्हाण, नवनाथ आपेट आणि इतर अनेकजण सहभागी झाले आहेत. यावेळी उपोषणकर्त्यांनी मराठा आरक्षणाला जाहीर पाठिंबा देण्यासाठी एक विशेष आवाहन केले आहे.
केशव नारायण पाटील यांनी इंगळी गावातील व परिसरातील सर्व तरुण मंडळे आणि तालीम मंडळांना विनंती केली आहे की, मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसलेल्या मराठा बांधवांना पाठिंबा देण्यासाठी आपल्या गणेशोत्सव मंडळाच्या स्टेजसमोर ‘मराठा आरक्षणाला जाहीर पाठिंबा’ असा फलक लावावा. त्यांनी असेही म्हटले की, या फलकामुळे आपण सर्वजण मराठा आरक्षणाच्या लढ्यात सहभागी होऊ शकतो.
या आंदोलनात इंगळी, रुई आजूबाजूच्या गावातील अनेक तरुणांनी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला आहे. या उपोषणातून मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी अधिक तीव्र करण्यात आली आहे.




