महाराष्ट्र ग्रामीण

गोकुळ शिरगाव एमआयडीसी येथे ‘वस्ताद ग्रुप’कडून महाप्रसाद आणि वृक्ष वाटप!

​कोल्हापूर: गोकुळ शिरगाव एमआयडीसी येथील ‘वस्ताद ग्रुप गणेश तरुण मंडळाने’ यंदाही गणेशोत्सव काळात सामाजिक उपक्रमांची परंपरा कायम ठेवत महाप्रसाद वाटप आणि वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले. मंडळाने ‘डॉल्बीमुक्त गणेश विसर्जन’ करून एक आदर्श घालून दिला.


​या कार्यक्रमाला स्थानिक उद्योजकांसह कामगार वर्ग, महिला आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. यावेळी उद्योजक श्री. अनुराग चौगुले, श्री. विठ्ठल जगदाळे, श्री. अरविंद पटेल, श्री. योगेश आगरी, श्री. जयदीप सावंत, श्री. केवल पटेल, श्री. संतोष जाधव, श्री. अनिल हिरेमिठ, आणि श्री. सतीश चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. या सर्वांनी मंडळाच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.
​मंडळाच्या वतीने उपस्थित लोकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले, तसेच पर्यावरणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी वृक्ष वाटपही करण्यात आले. मंडळाचे सर्व कार्यकर्ते या उपक्रमात सक्रियपणे सहभागी झाले होते.
​यंदाही ‘वस्ताद ग्रुप’ने डॉल्बीमुक्त गणेश विसर्जन करून शांततापूर्ण आणि पर्यावरणपूरक उत्सवाचा संदेश दिला. याबद्दल परिसरातील नागरिकांनी मंडळाचे अभिनंदन केले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button