गवई पक्षाच्या वतीने नवीन कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश कार्यक्रम!
कोल्हापूर (सलीम शेख ) : री. पा. इ. गवई पक्षाच्या वतीने जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना सूचित करण्यात आले आहे की राष्ट्रीय नेते डॉ. राजेंद्र गवई यांच्या आदेशानुसार नवीन सभासद नोंदणी व कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेशाचा भव्य कार्यक्रम सोमवार, दिनांक ८ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १२.३० वाजता सर्किट हाऊस, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष पी. एस. कांबळे (राष्ट्रीय उपाध्यक्ष) असतील, तर मुख्य संयोजक म्हणून बबन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम पार पडणार आहे. यावेळी भाऊसाहेब काळे (पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष), रमेश कांबळे हुपरीकर, रंगराव कांबळे, सिद्धार्थ देशमुख, सुधाकर कांबळे, सातापा कांबळे केरलीकर, संदीप हेर्लेकर, कोंडीबा कांबळे, आरळेकर व शोभा कुमटेकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
मुख्य संयोजक बबन शिंदे यांनी जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना कार्यक्रमात वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. कार्यक्रम ठरलेल्या वेळेतच सुरू होणार असल्यामुळे कोणाचीही निराशा होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
सर्व पदाधिकाऱ्यांनी वेळेवर उपस्थित राहावे ही विनंती.




