महाराष्ट्र ग्रामीण

पत्रकार राजेंद्र ढाले यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा!

गोकुळ शिरगाव (प्रतिनिधी) : दैनिक रोखठोकचे पत्रकार , जनहित पत्रकार संघाचे सचिव ,उत्तम कांबळे फाउंडेशन चे उपाध्यक्ष मा. राजेंद्र ढाले यांचा वाढदिवस कागल येथील स्व. गणपतराव गाताडे बौद्धिक अक्षम (मतिमंद ) मुलांसोबत साजरा करण्यात आला …
यावेळी शाळेतील मुलांना फळे आणि खाऊचे वाटप करण्यात आले
राजेंद्र ढाले यांचा प्रत्येक वाढदिवस हा समाजातील उपेक्षित निराधार लोकांसोबत साजरा केला जातो
याआधीही त्यांचा वाढदिवस वृद्धाश्रम , अनाथाश्रम , मूकबधिर व कर्णबधिर शाळा , वानरमारी समाज यांच्या सहवासात साजरा केल असून त्यांनी समाजात एक वेगळा आदर्श घालून दिला आहे
यावेळी बोलताना उत्तम कांबळे म्हणाले की , वाढदिवस हा एक आता इव्हेंट झाला असून जाहिरातबाजी आणि बाकी गोष्टींवर अमाप खर्च केला जातो पण राजेंद्र ढाले यांनी सुरू केलेला हा सामाजिक कार्याचा वसा असाच कायम सुरू ठेवावा…
संस्थेचे सचिव अतुल जोशी यांनी शाळेतील मुलांच्या संगोपनाची आणि अध्यापनाची माहिती दिली तर आजपर्यंतच्या शैक्षणिक वाटचालीच्या आठवणीना उजाळा दिला
या उपक्रमास आर.पी.आय चे जिल्हा अध्यक्ष उत्तम कांबळे , संस्थेचे सचिव आणि जेष्ठ पत्रकार अतुल जोशी , पत्रकार प्रशांत दळवी , पत्रकार नामदेव गुरव , के पंडित , उदय कांबळे , परिवार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अझरुद्दीन ताशीलदार , कागल तालुका उपाध्यक्ष आण्णापा आवळे , कागल सरचिटणीस सचिन मोहिते, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कामगार आघाडीचे करवीर तालुका अध्यक्ष मानसिंग संकपाळ, उपाध्यक्ष प्रदीप ढाले,हंचिनाळचे सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढाले,इयता 10 वी चे वर्गमित्र माणिक पाटील, विशाल मिरजे, संदिप वराळे, उद्योजक प्रविण शितोळे रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते के.पंडित,गौतम ढाले,उदय कांबळे, अशोक कांबळे, सर्जेराव ढाले, संतोष शिंदे, महावितरणचे वरिष्ठ यंत्र चालक इस्माईल मुल्ला इत्यादी उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button