श्री स्वामी समर्थ सेवा व बाल संस्कार चॅरिटेबल ट्रस्टच्या महिला सभासदांना ड्रेस कोडचे वाटप!

तामगाव (सलीम शेख ) : तामगाव येथे अनेक वर्षांपासून सामाजिक कार्य करणाऱ्या श्री स्वामी समर्थ सेवा व बाल संस्कार चॅरिटेबल ट्रस्टच्या महिला सभासदांना ड्रेस कोडचे वाटप करण्यात आले. संस्थेच्या अध्यक्षा मीनाक्षी रणजित दुर्गुळे आणि उपाध्यक्ष संगीता यशवंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. यावेळी सर्व महिला सभासदांना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छाही देण्यात आल्या.
या कार्यक्रमात संस्थेतील चांगले काम करणाऱ्या सभासदांचे विशेष कौतुक करण्यात आले. ड्रेस कोडचे वाटप सेक्रेटरी मालती सावंत, संचालक रंजना खराडे, शैला मंडे, नम्रता देसाई, भावना तटकरे, अश्विनी काटकर, सीमा साळोखे, सुप्रिया संकपाळ, निलताई खामकर, कार्याध्यक्ष अनिल खामकर, युवराज देसाई, संदेश दिवेकर आणि जितेश तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
ट्रस्टचे संस्थापक आणि मार्गदर्शक रणजित दुर्गुळे यांनी या वेळी सर्वांचे स्वागत केले आणि उपस्थित सर्वांचे आभार मानले.




