महाराष्ट्र ग्रामीण

गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्याने १२ गणेशोत्सव मंडळांना ‘गणराया अवॉर्ड’ देऊन केले सन्मानित!

गोकुळ शिरगाव (इरफान मुल्ला ) : गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्याने शांततामय, पारंपरिक आणि सामाजिक उपक्रमांवर भर देणाऱ्या १२ गणेशोत्सव मंडळांना ‘श्री गणराया अवॉर्ड २०२५’ देऊन गौरवण्यात आले. डीजे, डॉल्बी आणि लेझर शोला फाटा देत पारंपरिक वाद्य आणि विधायक उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला.
गोकुळ शिरगाव परिसरात दोन एमआयडीसी क्षेत्रे असल्याने गावांमध्ये अनेक तरुण मंडळांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे. या मंडळांनी वृक्षारोपण, व्यसनमुक्ती, रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर, देहदान, अवयवदान यांसारखे उपक्रम राबवून समाजात जनजागृती केली. तसेच, शांततेत आणि पारंपरिक पद्धतीने मिरवणुका काढून पोलिस ठाण्याच्या सूचनांचा आदर केला. याच कार्याची दखल घेत गोकुळ शिरगाव पोलिसांनी या मंडळांना पुरस्कार देऊन सन्मानित केले.
पुरस्कार विजेती मंडळे
या वर्षी ‘गणराया अवॉर्ड’ मिळालेल्या १२ मंडळांची नावे खालीलप्रमाणे आहेत:
* देश प्रेमी तरुण मंडळ, सांगवडेवाडी
* विठ्ठल चौक तरुण मंडळ, कोगील खुर्द
* श्री. गणेश मित्र मंडळ, कोगील बुद्रुक
* झुंजार मित्र मंडळ, कोगील बुद्रुक
* जय शिवराय तरुण मंडळ, नेर्ली
* मराठा टायगर्स ग्रुप, कणेरी
* शिवराजे शिवार बहुद्देशीय प्रतिष्ठान, महालक्ष्मी नगर, उजळाईवाडी
* स्वराज्य युवक कला, क्रीडा, तरुण मंडळ, कणेरी
* दिलदार तरुण मंडळ, कणेरीवाडी
* एकता कॉलनी अष्टविनायक तरुण मंडळ, कणेरी
* श्री. दत्त कृपा तरुण मंडळ राम मंदिर, तामगाव
* सैनिक ग्रुप, नेर्ली
पुरस्कार सोहळ्याचे आयोजन:
हा पुरस्कार सोहळा सहायक पोलिस निरीक्षक टी.जे. मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. गणराया अवॉर्ड समितीचे अध्यक्ष पोलिस उपनिरीक्षक एन. एच. बादोले, गोपनीय अधिकारी इजाज शेख, सदस्य ॲड. विजयकुमार कदम, राजेंद्र सूर्यवंशी, अश्विनी देसाई, स्वरूपा पाटील आणि कणेरीचे पोलिस पाटील संग्राम पाटील यांनी या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य केले. रितेश कांबळे आणि इजाज शेख यांनी कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले.
यावेळी गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्याकडील पोलिस पाटील, तंटामुक्ती समिती अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते, युवा ग्रामीण विकास संस्थेचे मोहन सातपुते, शिवराजे शिवार बहुउद्देशीय प्रतिष्ठानचे भैरु सातपुते, बंडू लोहार, राजाराम जाधव, अभिमन्यू गावडे, विनायक डाफळे, कणेरीचे गिरीश बुजरे, दिगंबर किल्लेदार, मोरे बंधू आणि परिसरातील अनेक नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button