कोल्हापूर जिल्हा परिषदेसमोर अनोखे आंदोलन!

कोल्हापूर : तिळवणी तालुका हातकणंगले येथील रहिवासी दोन वर्षे पाठपुरावा करुनही न्याय मिळत नसल्याने CEO निष्क्रियते साठी तिसरा वर्धापन दिन साजरा करणार असा इशारा सुनिल भिमराव गायकवाड यांनी दिला.गायकवाड त्यांच्या प्लॉटच्या प्रकरणात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कथित निष्क्रियतेचा निषेध करण्यासाठी २९/०९/२०२५ रोजी जिल्हा परिषदेसमोर ‘तिसरा वर्धापनदिन’ केक कापून साजरा करण्याची घोषणा केली आहे. हे आंदोलन सायं. ५ वाजता होणार आहे. गायकवाड, अनुसूचित जातीचे असून, त्यांचा ७५० स्क्वे. फूट चा प्लॉट गावचे सरपंच राजेश बाबासाहेब पाटील आणि ग्रामसेविका सुजाता कुमार कांबळे यांनी बेकायदेशीरपणे सरपंचाच्या घरगड्याच्या नावावर केल्याचा त्यांचा आरोप आहे. या संदर्भात त्यांनी CEO यांची १३ वेळा प्रत्यक्ष आणि निवेदनाद्वारे भेट घेतली आहे, परंतु आजअखेर कोणतीही कारवाई झाली नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
गायकवाड यांनी भ्रष्टाचारी ग्रामसेविका आणि भूखंडचोर सरपंचांना CEO संरक्षण देत असल्याचा आरोप करत, त्यांच्या निष्क्रिय कार्यपद्धतीचा तिसरा वर्धापनदिन साजरा करणार असल्याचे पत्रात म्हटले आहे.
यापूर्वी गायकवाड यांनी प्लॉट परत मिळवण्यासाठी व संबंधितांवर कारवाई करण्यासाठी लाक्षणिक उपोषण, आमरण उपोषण, अंबाबाई मंदिर ते जिल्हा परिषद दंडवत आंदोलन आणि नार्को टेस्टची मागणी यासारखी अनेक आंदोलने केली आहेत. त्यांनी ‘भूखंडचोरांना संरक्षण’ देण्याबद्दल आणि ग्रामसेविकेवरील कारवाई न करण्याबद्दल CEO यांच्यावर थेट प्रश्नचिन्ह उभे केले आहेत.
गायकवाड यांनी CEO यांना २९/०९/२०२५ रोजी कार्यालयात उपस्थित राहण्याची आशा व्यक्त केली असून, यावेळी आपल्यावर झालेल्या अन्यायाची गाऱ्हाणी पुन्हा एकदा मांडणार असल्याचे नमूद केले आहे.




