महाराष्ट्र ग्रामीण

बेकरी आणि किराणा दुकानातून महिलांचे दागिने लंपास करणाऱ्या दोन आरोपींना अटक! ९ लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त!

कोल्हापूर (सलीम शेख ) : कोल्हापूर जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने बेकरी व किराणा दुकानांमधील महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने चोरणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना अटक केली आहे. या आरोपींकडून तब्बल २२ ग्रॅम सोन्याचे दागिने, चोरीची स्प्लेंडर मोटारसायकल, तवेरा गाडी आणि अन्य साहित्य मिळून एकूण ९,१६,०५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर परिसरात बेकरी आणि किराणा दुकानांत खरेदीचा बहाणा करून महिलांना लक्ष्य करणाऱ्या दोन अनोळखी चोरट्यांनी महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावण्याच्या घटना घडत होत्या. या संदर्भात गोकुळ शिरगांव व शिरोळ पोलीस ठाण्यांमध्ये दोन गुन्हे दाखल झाले होते.
दिपावलीचा सण सुरू असल्याने महिलांकडे मौल्यवान दागिने असतात, हे लक्षात घेऊन आरोपींनी गुन्हे केले होते. घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला समांतर तपासाचे आदेश दिले होते.

पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ यांच्या पथकाने शिरोळ व सांगवडे परिसरातील सुमारे ९० सीसीटीव्ही फूटेज तपासून तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढला.
तपासात इम्रान समसुद्दीन मोमीन (वय 38, रा. हेर्ले, ता. हातकणंगले) आणि सुदाम हणमंत कुंभार (वय 40, रा. आंदळी, ता. पलूस, जि. सांगली) अशी आरोपींची नावे समोर आली. दोघेही चोरटे गुन्हा करताना वेगवेगळे नंबर प्लेट्स आणि स्टीकर्स लावलेली तवेरा कार वापरत असल्याचे आढळले.
पोलीसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पीर बालेसाहेब दर्ग्याजवळ (कोल्हापूर-सांगली महामार्ग) येथे सापळा रचून दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून सोन्याचे दोन मंगळसूत्र, लाल रंगाची तवेरा गाडी, स्प्लेंडर मोटारसायकल आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले.
उघडकीस आलेले गुन्हे
गोकुळ शिरगांव पोलीस ठाणे हद्दीत 12.150 ग्रॅम सोन्याचे दागिने, किंमत 1,57,000/-रुपये,
शिरोळ पोलीस ठाणे हद्दीत — 9.850 ग्रॅम सोन्याचे दागिने, किंमत 1,27,400/-रुपये,
शाहूपुरी पोलीस ठाणे हद्दीत — हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल (किंमत 60,000/-रुपये) असा
एकूण 9,16,050/-जप्त करण्यात आला.
ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, तसेच पोलीस अंमलदार प्रविण पाटील, सुरेश पाटील, हिंदुराव केसरे, रुपेश माने, दीपक घोरपडे, संजय पडवळ, अमित सर्जे, संतोष बरगे, रामचंद्र कोळी, सुशिल पाटील यांच्या पथकाने केली.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या या कारवाईमुळे महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मोठा दिलासा मिळाला असून, दीपावलीच्या पार्श्वभूमीवर चोरीच्या घटनांवर अंकुश लागण्यास लावण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button