महाराष्ट्र ग्रामीण

हत्येनं शहर हादरलं, जयसिंगपूरात धारदार शस्त्राने वार करून तरुणाची निर्घृण हत्या!

जयसिंगपूर (सलीम शेख) : जयसिंगपूर शहरातील गल्ली क्रमांक १३ मध्ये एका ३१ वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना आज बुधवार,दिनांक २२ ऑक्टोबर रोजी पहाटे उघडकीस आली.या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे आणि खळबळीचे वातावरण निर्माण झाले आहे.मृत तरुणाचे नाव सुनील किसन पाथरवट (वय ३०) असे असून, तो जयसिंगपूर येथील स्थानिक रहिवासी होता.ही घटना पहाटे चारच्या सुमारास उघडकीस आली आहे.सुनीलवर अज्ञात इसमाने धारदार शस्त्राने अनेक वार करून त्याची निर्घृण हत्या केली.घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूर पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आहे.या खुनामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.पोलिसांनी या प्रकरणाचा प्राथमिक तपास सुरू केला असून,परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहेत.काही संशयितांशी चौकशी केली जात असल्याचे समजते.या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.पोलीस निरीक्षक सत्यवान हाक्के यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून,लवकरच आरोपीचा छडा लावला जाईल,असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.दरम्यान, ऐन दिवाळी सणात सुनील पाथरवटच्या हत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.पोलीस अधिक तपास करीत असून, खुनामागील पार्श्वभूमी काय होती,हे समोर येणे बाकी आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button