महाराष्ट्र ग्रामीण

अतिवृष्टीग्रस्तांना तातडीने मदत द्या! – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) ची शरद पवार यांच्याकडे मागणी!

कोल्हापूर (सलीम शेख) : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( गवई) पक्षाचे राज्य उपाध्यक्ष बबनराव स. शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांची कोल्हापूर दौऱ्यादरम्यान भेट घेतली. अतिवृष्टीमुळे राज्यातील ज्या शेतकऱ्यांचे शेतजमिनींसह पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, त्यांना शासनाकडून त्वरित आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करावेत, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली.
राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने व विनाविलंब आर्थिक मदत मिळावी. अतिवृष्टीमुळे पिके व शेतजमिनीचे झालेले नुकसान लक्षात घेऊन, राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष पवार त्यांच्या राष्ट्रीय नेतृत्वाचा उपयोग करून शासनावर दबाव आणावा आणि शेतकऱ्यांना सर्वोपरी मदत लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत.
आर.पी.आय (गवई) चे राज्य उपाध्यक्ष बबनराव शिंदे यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते पवार विनंती केली की, “आपण या गंभीर बाबीवर लक्ष घालून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळवून द्यावी.”
शिष्टमंडळात यांचा समावेश
कोल्हापूर येथे शरद पवार भेट घेणाऱ्या या शिष्टमंडळात बबनराव सदशिव शिंदे यांच्यासोबतच संदीप हेरळेकर, विद्याधर शेटे, विनोद चव्हाण आणि सातापा कांबळे (केलेकर) यांचाही समावेश होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button