वैश्य बँकेत मोठी आर्थिक फसवणूक; व्यवस्थापकासह सात जणांवर गुन्हा दाखल!

राजारामपुरी (सलीम शेख ) : कोल्हापूर येथील राजारामपुरी पोलीस ठाण्यात वैश्य बँक, राजारामपुरी शाखेचे व्यवस्थापक असलेल्या निरज शिवाजी देशमुख यांनी बँकेच्याच काही खातेदारांसह एकूण सात जणांविरुद्ध सुमारे ८३ लाख ३६ हजार रुपयांची मोठी आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा दिनांक ८नोव्हेंबर २०२५ रोजी दाखल करण्यात आला असून, फिर्यादीच्या आरोपानुसार आरोपींनी संगनमत करून बँकेची आर्थिक फसवणूक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी निरज देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी क्रमांक सात दीपक गोपाळ देवळूरकर याच्यासह अन्य सहा आरोपींनी बँकेकडून तारण कर्ज घेतले. या कर्जाची रक्कम एकूण ८३,३६,०००रुपये इतकी असून, आरोपींनी ते कर्ज परतफेड न करता बँकेची फसवणूक केली.
या प्रकरणात सुलेखा सुरेश डावरे, दीपा दीपक देवळूरकर, संग्राम भिमराव पाटील, आराध्या बाळासो जाधव, संजय दत्तात्रय पिसाळे आणि विक्रम अशोक डबे यांचा समावेश आहे. या सर्वांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
गुन्हा नोंद झाल्यानंतर, तपास पथकाने या गंभीर आर्थिक गैरव्यवहाराच्या मुळाशी जाण्यास सुरुवात केली आहे. पोलीस उपनिरीक्षक (पो.स.ई.) रुपेश डुंबळे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.




