महाराष्ट्र ग्रामीण

कोल्हापूर शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने मोठी कारवाई

कोल्हापूर (सलीम शेख) : शहरातील महाविद्यालयांच्या परिसरात तरुणांकडून होत असलेली हुलजडबाजी आणि मुलींची छेडछाड
याची गांभीर्याने दखल घेत आज शहर पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील यांनी शहरातील महाविद्यालयांना भेट देऊन विद्यार्थिनींना मार्गदर्शन केलं. यावेळी शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने शाळा महाविद्यालयांच्या परिसरात हुल्लडबाजी करणाऱ्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई देखील करण्यात आली. कोल्हापूर शहरातील शाळा महाविद्यालयांच्या परिसरात तरुणांकडून मुलींची छेडछाड तसेच हूल्लडबाजी केली जातेय.या पार्श्वभूमीवर आज शहर पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील यांनी शहरातील सर्व पोलीस ठाण्यांचे पोलीस निरीक्षक तसेच शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक यांच्यासोबत महाविद्यालयांना भेट दिली. यावेळी पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील यांनी महाविद्यालयांच्या आवारात महाविद्यालयीन युवतींशी संवाद साधत तरुणांकडून छेडछाडीचे प्रकार घडत असतील तर निर्भयपणे पुढे येऊन निर्भया पथकांशी संपर्क साधून त्याची माहिती द्या. महाविद्यालयीन तरुणींचा कोणी तरुण पाठलाग करत असतील तर त्यासंदर्भात देखील तात्काळ पोलिसांना संपर्क साधून माहिती द्या असे आवाहन प्रिया पाटील यांनी केलं. यावेळी शाहूपुरी पोलीस निरीक्षक संतोष डोके शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांच्यासह शहरातील सर्व प्रभारी अधिकारी उपस्थित होते.

त्यावेळी शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने शाळा महाविद्यालयांच्या परिसरात विना लायसन वाहन चालवणे, ट्रिपल सीट
वाहन चालवणे नो पार्किंग मध्ये गाड्या पार्किंग करणे,फॅन्सी नंबर प्लेट वापरणाऱ्यांवर कारवाई करत सुमारे चार लाख रुपये दंडाची आकारणी देखील करण्यात आलीय. पोलिसांकडून या पुढच्या काळात देखील शहरातील शाळा महाविद्यालयांच्या परिसरात हुल्लडबाजी करणाऱ्या आणि महाविद्यालयीन तरुणींची छेडछाड करणाऱ्या तरुणांच्या विरोधात कारवाईची मोहीम तीव्र केली जाणार असल्याचे देखील सांगण्यात आलंय.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button