कोल्हापूर शहरातील अवैद्य गुटख्यावर स्थानिक गुजे अन्वेषण शाखेची मोठी कारवाई!

कोल्हापूर (सलीम शेख) : कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने कोल्हापूर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवैध गुटखा विक्री व निर्मिती करणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरू केली आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी केलेल्या कारवाईत गुटखा विक्री करणारे संतोष चव्हाण व हसन फारुख शेख यांना अटक करण्यात आली आहे.
या कारवाईत ८,१६,७४०/- किमतीचा गुटखा, तंबाखू, तसेच गुटखा निर्मितीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी एकूण ८,७०,७४०/- किमतीचा मुद्देमाल कायदेशीर प्रक्रियेद्वारे हस्तगत करण्यात आला आहे. गुटखा विक्री करणारे संतोष चव्हाण व हसन फारुख शेख यांच्यासह इतरांवर पोलीस ठाणे राजारामपुरी येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या कारवाईमुळे कोल्हापूर शहरात अवैध गुटखा विक्री आणि निर्मिती करणाऱ्यांवर वचक बसणार आहे.




