गोकुळ शिरगाव मधली केबल चोरी उघड ,कोल्हापूर पोलीस दलाची मोठी कामगिरी! तिघांना अटक!

गोकुळ शिरगाव (प्रतिनिधी इरफान मुल्ला) : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत १ कोटी २२ लाख ४६ हजार ८०० रुपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत तिघा आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून १,३२२ मीटर केबल, तांब्याच्या वस्तू आणि मोबाईल हँडसेट असा मोठा साठा हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक सागर वाघ यांच्या पथकाने केली. उजळाईवाडी (ता. करवीर) येथील सांगली-बंगलोर हायवेवरील टोल नाक्याजवळ सापळा रचून आरोपींना पकडण्यात आले. यावेळी संशयित आरोपी विनोद मछले (वय 47, रा. कांजरपाट वसाहत), शुभम बागडे (वय 27, रा. फुलेवाडी),चेतन लोंढे (वय 19, रा. राजेंद्रनगर) यांना अटक करण्यात आली.
मुख्य आरोपी विनोद मछले याने चौकशीत चोरीची कबुली दिली. त्याच्या साथीदाराच्या राजेंद्रनगर येथील गोदामातून चोरीचा माल जप्त करण्यात आला. पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपींना गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक योगेश कुमार आणि श्रीधरकुमार यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. यावेळी कारवाईत सहभागी अधिकारी व कर्मचारी सागर वाघ, विशाल खराडे, वैभव पाटील, सत्यजीत तानुगडे, प्रदीप पाटील, संजय हुंबे, अमित मर्दाने, शिवानंद मठपती, रोहित मर्दाने, योगेश गोसावी, राजू कोरे सहभाग घेतला .




