महाराष्ट्र ग्रामीण

​डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरमधील प्रलंबित विकासकामांची लोकप्रतिनिधींकडून पाहणी!

​अपूर्ण कामे तातडीने मार्गी लावण्याचे सत्यजितसिंह पाटील यांचे आश्वासन; नागरिक समस्यांबाबत आक्रमक

मुरगूड : (प्रतिनिधी : बाळासो कांबळे): डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर परिसरातील गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आणि अपूर्ण असलेल्या विकासकामांचा आढावा घेण्यासाठी नुकतीच लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पाहणी केली. या दौऱ्यादरम्यान नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेत, त्यावरील उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. ​कामांचा सविस्तर आढावा विद्यमान नगरसेवक तथा पाणीपुरवठा सभापती मा. सत्यजितसिंह पाटील यांनी याप्रसंगी उपस्थित राहून सुरू असलेल्या आणि रेंगाळलेल्या कामांची सविस्तर माहिती घेतली. नागरिकांना भेडसावणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या गंभीर प्रश्नावर त्यांनी सकारात्मक चर्चा केली. “येथील अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्याबाबत संबंधित विभागाला कडक सूचना देण्यात येतील,” असे आश्वासन त्यांनी यावेळी दिली.

नगरसेवक रणजित भारमल यांनी परिसरातील रस्ते, गटारी आणि इतर मूलभूत सुविधांच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधले. ही कामे गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण होणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. समाजसेवक बाळासो कांबळे यांनी नागरिकांच्या व्यथा मांडताना सांगितले की, प्रशासनापर्यंत सर्वसामान्यांचे प्रश्न पोहोचवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल. यांनीदेखील विकासकामात युवकांचे पूर्ण सहकार्य राहील, अशी ग्वाही दिली. या पाहणी दौऱ्यावेळी स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. “परिसरातील विकासकामे लवकरात लवकर पूर्ण होऊन आम्हाला दिलासा मिळावा,” अशी भावना रहिवाशांनी व्यक्त केली. यावेळी प्रशासकीय अधिकारी आणि विविध विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते. पाणीपुरवठा: विस्कळीत पुरवठा सुरळीत करण्यावर भर. ​ रस्ते व गटारी: साचलेल्या सांडपाण्याच्या प्रश्नावर तातडीने मार्ग काढण्याचे नियोजन. ​प्रशासन: संबंधित विभागांना कामाचा अहवाल सादर करण्याचे आदेश.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button