मुरगूड नगराध्यक्षांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने सदिच्छा भेट

मुरगूड (बाळासो कांबळे): मुरगूड नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. सुहासनीदेवी पाटील वहिनी यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने सदिच्छा भेट घेण्यात आली. यावेळी पक्षाच्या वतीने त्यांचा पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. शहराच्या विकासकामांबाबत आणि विविध सामाजिक प्रश्नांबाबत चर्चा करण्याच्या हेतूने ही भेट आयोजित करण्यात आली होती. यावेळी रिपाइं (आठवले) पक्षाचे कोल्हापूर जिल्हा सचिव सतिश माळगे साहेब यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने नगराध्यक्षांशी संवाद साधला.
या प्रसंगी दयानंद लोहार साहेब, बाळासो कांबळे, सिकंदर जमादार, नितीन कांबळे (उर्फ बाबासाहेब), अनिल नलवडे (आदमापूर), रवि शिवशरण, आकाश पोवार यांसह पक्षाचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सदिच्छा भेटीदरम्यान नगराध्यक्षांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले व शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.



