मुंबई

ब्लॅक पँथर पक्षाच्या मुंबई प्रदेश महिला उपाध्यक्षपदी कैसर खान यांची नियुक्ती; विक्रोळीत जनसंपर्क कार्यालयाचे थाटात उद्घाटन!

मुंबई (विक्रोळी): विक्रोळी येथे सामाजिक आणि राजकीय हालचालींना वेग आला असून, ‘ब्लॅक पँथर’ पक्षाच्या वतीने संघटन विस्ताराच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. पक्षाच्या मुंबई प्रदेश महिला उपाध्यक्षपदी कैसर अप्पा खान यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्या नूतन जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन रविवार, दिनांक २९ मार्च २०२६ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

पक्षाध्यक्ष सुभाष देसाई यांच्या हस्ते उद्घाटन विक्रोळी येथील या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन ब्लॅक पँथर पक्षाचे अध्यक्ष मा. सुभाष देसाई यांच्या शुभहस्ते फित कापून करण्यात आले. यावेळी बोलताना देसाई यांनी, महिलांचे संघटन मजबूत करणे आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी हे कार्यालय हक्काचे व्यासपीठ ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. कैसर खान यांच्या निवडीमुळे मुंबईत पक्षाची ताकद वाढेल, असेही त्यांनी नमूद केले.

बुद्ध विहाराच्या वतीने सन्मान या सोहळ्याचे औचित्य साधून जेतवन बुद्ध विहार, विक्रोळी यांच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बुद्ध विहाराच्या प्रतिनिधींनी ब्लॅक पँथर पक्षाच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार केला.

प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती या कार्यक्रमाला पक्षातील दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती. यामध्ये प्रामुख्याने: अजयकुमार कांबळे (मुंबई प्रदेश अध्यक्ष), दयानंद कांबळे (कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष), प्रविण निगवेकर, तानाजी गोंधळी, सुनील कांबळे, ऍड. अविनाश साळवी,  मधुकर भोसले, उदय सावरतकर,  अनिकेत देसाई, सुनीता देसाई यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते. या कार्यालयामुळे विक्रोळी परिसरातील नागरिकांच्या समस्यांना वाचा फुटेल आणि पक्षकार्याला गती मिळेल, अशी भावना नवनियुक्त उपाध्यक्ष कैसर खान यांनी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button